व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत; हा मराठी माणसाचा अपमान?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज नीतीआयोगाची सातवी बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पण या बैठकीत काढण्यात आलेल्या फोटोत मुख्यमंत्री शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसून आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्राविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नीती आयोगातील बैठकीतील एक फोटो ट्विट केला आहे. तसेच नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना योग्य स्थान न दिल्याचा दावा करत त्यांनी टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात !, असे ट्विटद्वारे रोहित पवारांनी म्हंटले आहे.