हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात पॉवरफुल नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांना मानले जाते. त्यांच्या कुटुंबातील त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे, पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार, नातू पार्थ पवार आणि आमदार रोहित पवार हेही राजकारणात आहेत. आता शरद पवार यांनी नगर पंचायत निवडणूक गाजवणाऱ्या रोहित पवार यांच्यावर नवीन आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. “भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पडण्यास पवार यांनी सांगितले आहे.
आमदार रोहित पवार यांनी आज ट्विट केले असून यांनी आजोबा शरद पवार यांनी आपल्यावर मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष @Jayant_R_Patil साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 17, 2022
पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.