व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रोहित पवारांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच एक पत्र लिहले आहे. राज्यातील शासकीय शासकीय आणि गायरान जागेत आणि त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात असलेल्या 20 लाख लोकांची घरे वाचवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

रोहित पवार यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहलेल्या पत्राबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “राज्यातील शासकीय आणि गायरान जागेत माझ्या मतदारसंघात 5 हजार तर राज्यात सुमारे 3 लाख घरे असल्याचे वाटत होते. पण हा आकडा मोठा असून माझ्याच मतदारसंघात 10 हजार आणि राज्यात सुमारे 5 लाख घरे असावेत. त्यामुळं ही घरं हटवल्यास सुमारे 20 लाख लोकं बेघर होणार आहेत.

माझ्या मतदार संघातील हे सर्वजण लोक अत्यंत गरीब आणि मोल-मजुरी करणारे आहेत. कोणत्याही परिस्थिती ही घरं वाचवावी लागतील. त्यामुळे याबाबत जातीने लक्ष घालून या गरीब लोकांना दिलासा द्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.