खचून जाणं साहेबांच्या डिक्शनरीतच नाही, सरकार महाविकास आघाडीचंच येणार – रोहित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र अजित पवारांसोबत गेलेल्या ९ आमदारांपैकी अनेकांनी युटर्न घेत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सरकारला बहुमत सिद्ध करणे आता अवघड जाणार असल्याचे बोलले जातेय. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत खचून जाणं शरद पवार साहेबांच्या डिक्शनरीतच नाही, सरकार महाविकास आघाडीचंच येणार असा विश्वास व्यक्त केलाय.

रोहित पवारांनी ट्विटमध्ये ‘लहानपणापासूब साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौटुंबिक साहेब कधीच खचून जात नाहीत. माझे आजोबा आप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्रदादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत. आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते’ असे सांगितले आहे. पुढे अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडीलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भुमिका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो किंवा राजकीय खचून जाणं साहेबांच्या डिक्शनरीतच नाही. असं रोहित पवार म्हणाले आहेत.

https://twitter.com/RohitPawarSpeak/status/1198514936038559745

तसेच आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसंच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत. पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती पवार साहेब होतो. सर्वसामान्यांचा आवाज होतो व अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पाहत आहेत.अशावेळी कुटुंबाचा घटक म्हणुन मला व्यक्तीश: वाटतं की आपण सर्वांनी साहेबांसोबर रहायला हवं. लवकरच महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दुरावू नयेत असे म्हणत रोहित यांनी अजित पवारांना माघारी येण्याची भावनिक हाक दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment