पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यवामुळे वाद निर्माण झाले आहेत. विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून त्यांची माफी मागितली होती, असे विधान राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केले होते. यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती असे विधान त्यांनी केले. यामुळे आता पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले सुधांशू त्रिवेदी
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना? असं सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) म्हणाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला.
आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना?पण आता डोक्यावरून पाणी चाललंय.
त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय. pic.twitter.com/ilfAYBGh0o— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2022
रोहित पवारांचे प्रतिउत्तर
रोहित पवार यांनी ट्विट करून सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता डोक्यावरून पाणी चाललंय.त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे, असा इशारादेखील रोहित पवार यांनी यावेळी दिला.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय