रोहित शेट्टीचा दिलदारपणा; मुंबई पोलिसांसाठी उपलब्ध करून दिली तब्बल ‘इतकी’ हॉटेल्स….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, अन्य वैद्यकीय कर्मचारी तसेच पोलिस आणि पालिका कामगार आपल्या जीवाची बाजी लावून रात्रंदिवस झटत आहेत. अशा कोरोना योद्धांना प्रोत्साहन देण्यासाठी काही सेलिब्रेटींनी गाणी बनविली आहेत तर काही सेलिब्रेटी आपापल्या परीने मदत करीत आहेत.

अभिनेता अक्षय कुमार, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. रोहित शेट्टीने या अगोदर पोलिसांना आराम करण्यासाठी आठ हॉटेल्स उपलब्ध करून दिली होती. आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. आता त्याने तब्बल अकरा हॉटेल्स पोलिसांना आराम करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत.

दिग्दर्शक रोहित शेट्टी हा नेहमीच अशा प्रसंगी धावून येत असतो. सध्या कोरोनासारख्या महामारीत तो वारंवार मदत करीत आहे. आता त्याने तब्बल अकरा हॉटेल्स पोलिसांसाठी उपलब्ध केली आहेत. याबद्दल पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोशल मीडियावर रोहितचे आभार मानले आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आम्ही रोहित शेट्टीचे मनापासून आभार मानतो. आम्हाला सुरुवातीपासून ते मदत करीत आले आहेत. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आम्हाला त्यांनी अकरा हॉटेल्स उपलब्ध करून दिली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment