हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आरपीआयचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे. “उद्धवजींबद्दल मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कदाचित ते आमच्या सोबत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले नसते,” असे आठवले यांनी म्हंटले आहे.
आरपीआयचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आठवले म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. मी नरेंद्र मोदींसोबत गेलो नसतो तर केंद्रीय मंत्री झालो नसतो. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले नसते. सण 1990 मध्ये मी एकटाच शरद पवारांसोबत गेलो. त्यामुळे मंत्री झालो. बाकी सगळे मागे राहिले. मला उद्धवजींना सांगायचे आहे कि, अजूनही तुम्हाला अडीच-अडीच वर्षाची ऑफर आहे. पण ही ऑफर स्विकारायची की नाही हा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, असेही आठवले म्हणाले.
यावेळी आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एनडीएत येण्याचे आवाहनही केले. यावेळी आठवले म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तर भविष्यात भाजप, शिवसेना आणि रिपाइंही एकत्र येऊ शकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आले पाहिजे, असे आठवले यांनी म्हंटले.