प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी ;आठवलेंनी शेअर केली भन्नाट कविता

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर- शरद पवार भेटीत देशातील राजकीय विषयावर खोलवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या भेटीवरून आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच 2024 ला मोदीच पंतप्रधान होणार असेही ते म्हणाले.

प्रशांत किशोर यांच्या कोणी  लागू नका नादी , २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!…नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?”, अशी कविता रामदास आठवले यांनी ट्विट केली आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो आठवले यांनी ट्विट केला आहे.

कितीही स्ट्रॅटेजी करा, येणार तर मोदीच – फडणवीस

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवार- प्रशांत किशोर भेटीवरून पवारांना टोला लगावला होता. कोणी कितीही स्ट्रॅटेजी करू द्या 2024 ला मोदी च पुन्हा एकदा पंतप्रधान होणार अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here