शरद पवारांचा ‘तो’ दावा आठवलेंनी फेटाळला ; म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारी मंडळी ही सत्ताधाऱ्यांपैकीच होती असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर देत पवारांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली.

26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला भाजपने घडवून आणला यात तथ्य नाही. प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी द्यायला नको होती मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. त्यामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये कुणी आतंकवाद्यांनी शिरुन हल्ला केला. शरद पवार जुने जाणते आहेत. या प्रकणाची चौकशी व्हावी म्हणजे सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले.

नक्की काय म्हणाले होते शरद पवार –

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं गंभीर विधान शरद पवार यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like