हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि शरद पवारांवर सातत्याने टीका करत आहेत. पडळकर यांच्याकडून वारंवार हल्ले चढवले जात असताना आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजप या पक्षाचे बुजगावणं आहेत या बुजगावण्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये असं आवाहन त्यांनी केले आहे.
#गोपीचंद_पडळकर हे भाजप या पक्षाचे बुजगावणं आहेत कारण उठ सूट आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा यांच्यावर टीका करण्यापेक्षा धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सरकार समोर उपाययोजना मांडव्यात.#सचिनखरात_आरपीआय pic.twitter.com/lcbo3VRsZH
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) June 3, 2021
खरात म्हणाले की पडळकर यांनी उठ सूट आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा यांच्यावर टीका करण्यापेक्षा धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सरकार समोर उपाययोजना मांडव्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे पण गैरवापर करण्याचा अधिकार दिला नाही त्यामुळे टीका करताना आपली स्वतःची राजकीय उंची तपासावी असा टोला सचिन खरात यांनी लगावला आहे.
पडळकर नेमकं काय म्हणाले होते –
मराठा आणि ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी शरद पवार हेच जबाबदार असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी शरद पवारांची कधीच इच्छा नव्हती अशा शब्दांत पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल केला होता.