व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार; प्रवासी असलेल्या धावत्या गाडीने घेतला पेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये प्रवासी असलेल्या व्हेरिटो गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या वाहनातील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे
नुकसान झाले आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये नाशिक-दिंडोरी मार्गावरून व्हेरिटो गाडीतुन काही प्रवासी निघाले होते. यावेळी गाडीने अचानक पेट घेतला. गाडीला अचानक आग लागल्यानंतर घाबरून न जाता चालकाने गाडी रस्त्यालगत उभी केली. तसेच प्रसंगावधान राखत प्रवाशांना गाडीतून बाहेर काढले.

या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.