हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळून काही महिने उलटले असतानाच आता तशीच परिस्थिती राजस्थानमध्ये उद्भवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल झाल्याची बातमी सध्याच्या ट्विटर ट्रेंडिंगमध्ये चालली आहे. १२ तारखेच्या मध्यरात्रीपासूनच हा ट्रेंड पुढे जात असून रविवारी राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासोबतच भाजपकडून सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली गेली असल्याच्याही चर्चा आहेत.
Reports- Big Sunday upset seems to be in store for Congress in Rajasthan- #Sachinpilot reportedly arrives in Delhi with 20+ MLAs, even as Rajasthan CM Gehlot has been trying to hold the peace. MP redux? Waiting for official details…
— devinagupta (@devinaguptanews) July 11, 2020
दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीसुद्धा आमदारांशी चर्चा करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. कोरोना परिस्थितीचं कारण देत कुणीही राज्याबाहेर जाऊ नये तसेच बाहेरील कुणाला राज्यात यायला परवानगी देऊ नये असे स्पष्ट निर्देशही परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. यासंदर्भातील ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
Rajasthan Government issues regulations on inter-state movement of persons, in wake of an upsurge in #COVID19 positive cases in the state. People travelling by road shall be screened at check post to be established on state borders. pic.twitter.com/DO7ZHNSwr7
— ANI (@ANI) July 11, 2020
ज्येष्ठांना वारंवार संधी देत तरुण कार्यकर्त्यांकडे आणि नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसच्या गोटातून बाहेर पडत असून मध्यप्रदेश पाठोपाठ काँग्रेस आता राजस्थानही गमावणार का? हा प्रश्न उभा राहिला आहे. सचिन पायलट यांनी २५ आमदारांना एका रिसॉर्टमध्ये २५ वेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलं असून या आमदारांचं नक्की काय होणार हे रविवारी सकाळीच समजू शकणार आहे.
Wikipedia what is happening to you ?? Just a span of a minute? Shocked! #wikipedia #Sachinpilot @Wikipedia @SachinPilot pic.twitter.com/Vt7fllPkXR
— Harsh Vijayvargiya (@harsh_vijay09) July 11, 2020
https://twitter.com/NishantSinghGu1/status/1282050504038572032?s=19
दरम्यान ट्विटरवर यासंदर्भातील मीम्सचा पाऊस पडला असून अमित शहांच्या कृपेने सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ही परिस्थिती कशी सांभाळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
Breaking News:
— Syed Faraz Ibn Israr (@_ifarazahmad) July 11, 2020
So is it another Jyothiraditya Scindia Episode Repeat in Rajasthan.#Sachinpilot #IndianNationalCongress pic.twitter.com/sI7GWTySNv