क्रिकेटमधील नव्या नियमांवरून सचिन आणि सौरवने ICC ची उडविली खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत. १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. त्या दोघांनी मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारतीय क्रिकेटला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी अगदी समर्थपणे पेलली. वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी म्हणून या दोघांनी दमदार कामगिरी केलेली आहे. या जोडीने जगभरातील आपल्या काळातील अनेक महान गोलंदाजांवर अधिराज्य गाजवले आहे. या जोडीला नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका ट्विटच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.

 

ICC ने सचिन आणि गांगुली यांचा एक एकत्रित फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर ट्विट केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये ICC ने असे लिहिले की वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर + सौरव गांगुली म्हणजे १७६ वेळा दमदार भागीदारी, तसेच ८,२२७ धावा आणि सरासरी ४७.५५… इतर कोणत्याही फलंदाजांच्या जोडीने अद्यापही ६,००० धावांचा पल्लाही गाठलेला नाही.

 

 

ICC च्या या ट्विट वर सचिनने एक जोरदार रिप्लाय दिला. “ही आठवण खूपच मस्त आहे,. पण तुला काय वाटतं दादी (गांगुली). ICC च्या नव्या नियमानुसार ३० यार्ड वर्तुळाबाहेर ४ खेळाडू आणि २ नवे चेंडू असते तर आपण अजून किती धावा काढू शकलो असतो?”, असं लिहित त्याने मस्करी करण्याचा ईमोजी वापरला. गांगुलीने सचिनच्या या ट्विट वर लगेच उत्तरही दिलं. “मला वाटतं अजून ४,००० धावा आपण सहज केल्या असत्या. आणि सामन्यात दोन नवे चेंडू … ऐकून खूप मस्त वाटतंय.. अगदी पहिल्या षटकापासून कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषेपार जाताना दिसतोय… तोही पूर्ण ५० षटकांत .” असा रिप्लाय गांगुलीने दिला.

Ganguly-Tendulkar faced better bowlers than Rohit-Kohli: Ian ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment