हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडीकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होत आहार. भाजप मात्र सहाव्या जागेवर निवडणूक लढणार असून त्यासाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान खोत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर फडणवीस हे आधुनिक युगातील राजकीय चाणक्य असल्याचे कौतुकही त्यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत अनेकजण उभे राहिले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान सभेसाठी माझी उमेदवारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते आजच्या आधुनिक युगातील राजकीय चाणक्यच म्हणावं लागे. ते या निवडणुकीत मला जे सांगतील ते मी करणार आहे.
आज आम्ही ज्या सहा जागा लढवणार आहोत. या जागांपैकी सहाव्या जागेसंदर्भात सर्वोतोपरी निर्णय हा देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. ते जो निर्णय घेतील तो मी मान्य करेन, असेही खोत यांनी सांगितले.