कराड | मिडीयामधला किंवा सामाजिक क्षेत्रातील एखादी व्यक्ती तुमच्या वर्मावर बोट ठेवून बोलत असेल तर त्याच तोंड बंद ठेवण्यासाठी जुनं प्रकरण काढून तुम्ही त्याला अटक केली. तुम्हांला अटक करायची होती तर एक वर्षे का थांबला? असा सवाल करत हे सरकार सूडबुद्धीने प्रत्येक गोष्ट करण्याच्या दृष्टीकोनातुन भूमिका बजावत आहे. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केला आहे.
सदाभाऊ म्हणाले , आपल्या देशामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण मीडिया, वर्तमान क्षेत्राकडे बघत असतो. एखादी व्यक्ती तुमच्यावर आक्षेपार्ह विधान करत असेल तर त्यासाठी न्यायालय आहे. त्यासाठी सरकारने न्यायालयात जावावं. मिडीयामधला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तुमच्या वर्मावर बोट ठेवून बोलत असेल तर त्याच तोंड बंद ठेवण्यासाठी जुनं प्रकरण काढून तुम्ही अटक केली.
त्याच वेळी राज्यात अशी अनेक प्रकरणे आहेत ज्याच्या चौकशा वर्षानुवर्षे चाललेल्या आहेत. परंतु त्यावर ठोस कारवाई करत नाही. कंगना खरं बोलली की खोट बोलली हे न्यायालय ठरवेल, पण लगेच तुम्ही तिच्या घरावर बुलडोझर फिरवला. अर्णब तुमच्या विरोधात बोलतोय म्हणून तुम्ही त्याला अटक केली. त्यामुळे हे सरकार सूडबुद्धीने प्रत्येक गोष्ट करण्याच्या दृष्टीकोनातुम भूमिका बजावत आहे. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’