Sunday, May 28, 2023

इयत्ता 10 वी मध्ये शिकणारी साक्षी मागच्या 20 दिवसांपासून गायब; काय आहे कारण?

सोलापूर : महाराष्ट्रामध्ये सध्या तरुण मुलींचं अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची साक्षी इंगोले ही मुलगी मागच्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहे.

बार्शीतील सिल्व्हर ज्यूबली शाळेत साक्षी ही इयत्ता दहावीच शिक्षण घेत आहे. याबाबत गणेश भोकरे या इसमा विरोधात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून बार्शी पोलीस पोलिसात आय पी सी कलम 154 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

संबंधित इसमाने फूस लावून आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आई – वडिलांनी व्यक्त केला आहे. सदरील घटनेला 20 दिवस ओलांडून गेले असले तरी मुलीचे आई – वडील अजून ही मुलीच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून हे प्रकरण प्रकाशात आणलं आहे. यामाध्यमातून चित्रा वाघ यांनी पोलीस प्रशासन आणि असंवेदनशील सरकारला धारेवर धरलं आहे.