‘सलमान’ने उतरवला भररस्त्यात शर्ट, खायला लागली थेट पोलीस स्टेशनची हवा!

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला आजकाल कोण ओळखत नाही. सलमान खान म्हणजे तरूणींचा क्रश आणि तरूणांचा स्टाईल आयकॉन. सलमान खानची शर्ट उतारण्याची स्टाईल अनेकांना भावते. अनेक तरूण त्याची ही स्टाईल कॉपी करत असतात. सध्या अशाच एका डुप्लिकेट सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये डुप्लिकेट सलमान भर रस्त्यात शर्ट उतरवताना दिसत आहे. हि घटना लखनौमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे या डुप्लिकेट सलमान खानला त्याच्या कृतीमुळे अटक केली आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आझम अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे. तो ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरात रील बनवत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

त्याचे इन्स्टाग्राम रील बऱ्यापैकी सलमान खानच्या गाण्यावरचे आहेत. यामुळे तो सलमानखानचा किती मोठा फॅन आहे ते समजेल. या व्हायरल व्हिडिओमध्ये तो शर्टलेस झालेला दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
नवनीत राणांवर टीका करताना अजितदादांचा नेम पडळकरांवर; म्हणाले की, 1 पट्ट्या….

शरद पवारांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ

नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अखेर अटक

WhatsApp आणणार 3 दमदार फीचर्स; Movies सुद्धा शेअर करता येणार