हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छ. संभाजी महाराज यांच्याविषयी एक वक्तव्य केले. यावरून भाजप नेत्यांकडून पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या धर्म मार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले, मारले, त्यांच्याच वंशजाने ‘धर्मवीर’ शब्द प्रचलित केला. मात्र, छत्रपती संभाजी महाराज हे ‘स्वराज्य रक्षक’च आहेत…” असे शिंदे यांनी म्हंटले आहे.
प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे ‘स्वराज्य रक्षक’च असल्याचे म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते, ते साहित्यिक सुद्धा होते. चार-चार ग्रंथ त्यांनी लिहले. पण या धर्ममार्तंडानी, मनुवाद्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्याच काम केलं आहे. धर्मवीर संभाजी महाराज म्हणता. अजितदादा पवार फक्त विधिमंडळाच्या सभागृहात स्वराज्य रक्षक बोलले. त्यांच्या बोलण्याने सत्ताधाऱ्यांना मिर्च्या झोंबल्या.
सांगा देवेंद्र फडणवीस साहेब जर तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणता मग छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं? कोण आहे ते अनाजी पंतांच्या औलादी? आमच्या राजाला तुमच्याच चांडाळ-चौकड्यांची पकडून दिलं हा इतिहास आम्ही विसरणार नाही. तुम्ही धर्मवीर म्हणता. आणि मग छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची जयंती मग तुम्ही का साजरी करत नाही? स्मृतिदिन साजरा करता. हा तुमचा संस्कृतिक दहशतवाद आहे. पण संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा सेवा संघ असेल खरा इतिहास ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेलं.
https://www.facebook.com/watch/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB&v=1003113787313258
संभाजीराजे धर्मासाठी नाही तर ते रयतेसाठी लढले
ज्यावेळेस खरा इतिहास समजून सांगितला. आता सगळे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणायला लागले. कुळवाडी, कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले. म्हणून भाजपच्या पिलावळीला,देवेंद्र फडणवीसांच्या पिळवळील, मनुवाद्यांच्या, आरएसएसच्या पिळवळील आता घाम सुटला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व हे स्वराज्यासाठी होतं. ते धर्मासाठी कधीच लढले नाहीत, ते रयतेसाठी लढले असल्याचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी म्हंटले.