हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का?ते पुढील काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. दरम्यान त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत आपली पुढील भूमिका जाहीर केली. “शिवसेनेच्या वतीने मला पक्ष प्रवेशाची अट घातली होती. मात्र, मी ती नाकारली. मला शंका होती कि यात नक्कीच काही तरी घोडेबाजारी होणार. ती होऊ नये म्हणू मी हि निवडणूक लढवणार नाही. पण माझा हा माघार नाही हा माझा स्वाभिमान आहे. मी स्वराज्यसाठी यापुढे काम करणार आहे. माझ्यासाठी खासदारकीपेक्षा जनता म्हत्वाचाही आहे, अशी घोषणा संभाजीराजेंनी आज गेली.
संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो कि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या ठिकाणी पुतळा आहे. त्या ठिकाणी आपण दोघांनी जाऊ आणि त्या ठिकाणी बोलायचे. मी खोटं बोलत नाही. मागील काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
मुख्यमंत्र्यानी त्यांचे दोन खासदार माझ्याकडे पाठवले. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी माझ्याशी फोनद्वाराने बोलत भेटण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर मी त्यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मला त्यांनी शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली. मात्र मी ती त्याच क्षणी मला नाकारली. त्यावेळी मी त्यांना महा विकास आघाडीच्यावतीने अपक्ष म्हणून पुरस्कृत म्हणून उमेदवारी द्या अशी मी मागणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यानी आपला दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आता मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझी हि माघार नसून आता मी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्र पिंजून काढणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी मात्र, दिलेला शब्द पाळला नाही
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अपक्ष म्हणून मी राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महा विकास अगदी पुरस्कृत अपक्ष म्हणून मला पाठींबा द्यावा अशी मी मागणी केली होती. मात्र, त्यांनी मला उमेदवारी न देता आमचे प्रिय मित्र, संजय पवार यांना उमेदवारी जायीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली. पण मुख्यमंत्र्यांनी माझा फोन घेतला नाही. ज्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांसोबत माझ्या बैठका झाल्या, त्यांच्याकडेही माझ्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते. मुख्मयंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशा शब्दात संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
आता पुढची दिशा ‘स्वराज्य’ बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार !
राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली पुढची राजकीय दिशा व भूमिका जाहीर केली. आता यापुढे आपण राज्याचा दौरा करुन महाराष्ट्रभरातील मावळ्यांची बांधणी करणार आहोत. स्वराज्यच्या माध्यमातून प्रत्येक मावळ्यापर्यंत मी पोहचणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.