हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणासंदर्भात नुकताच मुख्यमंत्री ठाकरेंनी निर्णय घेतला. एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असे वक्तव्य, घोषणा करता येता कामा नये. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे”, असे संभाजी छत्रपती यांनी म्हंटले.
मुंबई येथील आझाद मैदानावर आज संभाजी छत्रपती यांनी उपोषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणा संदर्भात मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. एक मागासवर्गीय आयोग असतांना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाला दिशाभूल करू नये.
यावेळी संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारकडे मागणीही केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पात मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यांसदर्भात तरतूद करावि., ब्लू प्रिंट दाखवावी. आर्थिक नियोजन सांगावे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी त्यांच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या करावयात, असे ते यावेळी म्हणाले.