हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरणारे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर ते कोणता नवा पक्ष काढणार कि कोणत्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असेहि अनेक प्रश्न उपस्थित होते. मात्र, आज संभाजीराजेंनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “आपली भूमिका 12 मे रोजी पुण्यातून स्पष्ट करणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आज माध्यमांशी संवाद ते म्हणाले कि, माझा खासदारकीचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. या कार्यकाळात मी अनेक कामे केली आहेत. माझ्या इतर पक्षात जाण्याबाबतच्या चर्चाही आहेत. परंतु मी माझी राजकीय भूमिका हि पुण्यातून स्पष्ट करणार आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार असल्याचे मी म्हटले होते, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
‘या’ पक्षातील नेत्यांनी दिली होती पक्ष प्रवेशाची ऑफर
संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांनी त्यांना ऑफर दिली होती. यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करू, असे म्हंटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करू असे म्हंटले होते.