Gold Price Today : सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या ; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालच्या दरवाढी नंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज 6 मे 2022 रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 0.21 टक्के घट होऊन प्रतितोळा 108 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. चांदीच्या दरात मात्र आज किंचित वाढ झाली आहे. MCX वर चांदीचा भाव 144 रुपयांनी वाढून 62,480 रुपये प्रति किलो झाला.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : (Gold Price Today)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,470 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,470 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने (Gold Price Today) बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

हे पण वाचा : 

महागाईचा दणका!! साबण, शाम्पूसह ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागल्या

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

PM Kisan: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

Leave a Comment