हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. तर संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवाराची दिली नव्हती. दरम्यान निवडणुकीत पवारांचा प्रभाव झाला. यावरून संभाजीराजे यांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे.
संभाजीराजे यांनी ट्विट केले असून तत्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।। तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय, असे ट्विट करत त्यांनी ‘वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. असा टोला संभाजीराजेंनी लगावला आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेना आणि संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारुन पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची 42 मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती.