Wednesday, June 7, 2023

राज ठाकरे वैफल्यग्रस्त…त्यांना उपचाराची गरज; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या नामांतरावरून निशाणा साधला. आमच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. मात्र, हिंदुत्वावर बोलणाऱ्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? असा सवाल ठाकरेंनी विचारला. त्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला. राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यामुळे ते अशा प्रकारे बोलत आहेत. त्यांच्या व मनसेपेक्षा आमच्या शिवसेनेवर जास्त गुन्हे दाखल झाले आहेत, असे राऊत यांनी म्हंटले.

पुण्यात राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. आमच्यावर टीका करणारे राज ठाकरे हे हिंदुत्ववादी कधी झाले हे यांनी सांगाव. आमचं हिदुत्व हे आमच्याजवळ आहे. त्यामुळे यांनी हिंदुत्वावर बोलू नये. वास्तविक राज ठाकरेंनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली आहे. त्यातून त्यांना वैफल्य, नैराश्य आलेले आहे. यांच्याप्रमाणे मनसेतील सर्व लोकांना उपचाराची गरज आहे.

आज खरे सांगायचे झाले तर राज ठाकरेनी सोयीनुसार हिंदुत्वाचा मुद्दा उचला आहे. औरंगजेबाच्या कबरीबद्दल बोलणाऱ्या राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे की, पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारकडे आहे. औरंगजेबाची कबर तोडून टाका तुम्हाला कुणी अडवलं आहे. आमच्या हिंदुत्वा विषयी कोणीही प्रश्न विचारु शकत नाही. अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कोण रोखल आहे का? उत्तर प्रदेशमध्ये कोण सापळा रचणार, भाजप पुरस्कृत दौऱ्या विरोधात कोणी केला. राज यांनी सोयीनुसार हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. आपला इतिहास त्यांनी तपासून पाहावा. मातोश्री, मातोश्री आहे, अशी टीका राऊतांनी केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

परवा मुख्यमंत्री म्हणाले, संभाजीनगरचे नामांतर झालं, नाही झाले तरी फरक पडत नाही. मी बोलतोय ना. तू कोण आहेस? तू बल्लभभाई पटेल आहेस कि महात्मा गांधी? मी बोलतोय याला काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रात सरकार होते. आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जिवंत ठेवायचा आहे. याच गोष्टी फक्त यांना करायच्या आहेत. मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिले त्यांना.