सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | दहशतवादी बनवण्याचा कारखाना भारतात आरएसएस आणि भाजपकडे आहे असं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. या विधानाचा संदर्भ देत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतंच युनोमध्ये भारतावर ताशेरे ओढले होते. ही देशाची नाचक्की असून या विधानाबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी देशवासीयांची माफी मागावी अशी विनंती भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी केली आहे. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले. सोलापूरमध्ये आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे याचं मत जाणून घेतलं असता त्यांनी इम्रान खान आणि संबीत पात्रा या दोघांचेही आभार मानले आहेत. शिवाय पात्राने जुने मुडदे उकरून काढू नयेत असंही शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची स्तुती केली की लोक डोक्यावर घेतात, हे पुरेपूर जाणून असलेल्या संबीत पात्रा यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने शिवराय आणि त्यांच्या पराक्रमी इतिहासावर भाष्य करत शिंदेंवर निशाणा साधला.

Leave a Comment