1000 कोटींचे ड्रग्ज जप्त करणारे समीर वानखेडे घेणार नाही मुदतवाढ, बॉलिवूडमध्ये कशी खळबळ माजवली जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनल प्रमुख समीर वानखेडे एक्सटेंशन घेणार नाहीत. त्यांचा कार्यकाळ या वर्षी 31 डिसेंबरला संपत आहे. वानखेडे हे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून NCB मध्ये डेप्यूटेशन वर होते. वानखेडे यांनी कथित बॉलीवूड-ड्रग्स सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. यावर्षी त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात क्रूझमधून अटक केली. तेव्हापासून ते सतत चर्चेत होते.

अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि त्यांच्यात छत्तीसचा आकडा दिसून आला. मलिक यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळावर एक नजर टाकूयात.

शेकडो अटक: समीर वानखेडे यांनी ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत 96 जणांना अटक केली. यावेळी 28 गुन्हे दाखल करण्यात आले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले.

ड्रग्ज जप्त: समीर वानखेडे यांनी सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 11 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता फ्रिज केली आहे.

सुशांत सिंग राजपूत केस: NCB चे झोनल डायरेक्टर म्हणून, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश असलेल्या ड्रग्ज सिंडिकेटवर कारवाई करण्यात वानखेडेंचा सहभाग होता.

आर्यन खानची अटक: या वर्षी ऑक्टोबरमध्ये, वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई किनार्‍यावरील कॉर्डेलिया क्रूझ शिपवर छापा टाकला होता. यानंतर त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह इतर काही लोकांना अटक केली.

2008-बॅचचे अधिकारी: समीर वानखेडे, 2008-बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी, मुंबईतील केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयात सामील होण्यापूर्वी दिल्लीस्थित केंद्रीय तपास संस्था NIA मध्ये काम करत होते, जिथे त्यांनी दहशतवादाशी संबंधित डझनभर प्रकरणे सोडवली. अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ISIS च्या दहशतवाद्याला अटक : समीरच्या टीमने ISIS च्या दहशतवादी अरीब मजीदला अटक केली होती. हा अरीब मजीद तोच व्यक्ती आहे जो इराक आणि सीरियामध्ये जिहादी दहशतवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय तरुणांची निवड करत असे.

मलिक यांचा आरोप : NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जाती कोट्यातील नोकरी घेतली. वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून त्यांच्या वडिलांनी मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Leave a Comment