हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. 11 डिसेंबरला नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. मोदींच्या दौऱ्याआधी प्रशासनही तयारीला लागलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाचे उदघाटन लांबले होते. मात्र आता ११ डिसेंबरला मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यासोबतच नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन करण्यात येणार आहे. ११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मोदींचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. विमानतळ मेट्रो स्थानकावर मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण केले जाईल आणि त्यानंतर ते समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी रवाना होतील
समृद्धी महामार्ग हा २०१४ काळातील फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रक्लप होता. सम्रुद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या ८ तासांत होणार आहे. ७०१ किमी लांबीच्या या महामार्ग प्रकल्पासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. हा मार्ग एकूण १० जिल्ह्यांतुन जात असून जवळपास ९० गावांना जोडत आहे.