Sana Javed : कोण आहे सना जावेद? जिच्यासोबत शोएब मलिकने केलं लग्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sana Javed । एकीकडे पत्नी सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे तिचा पती शोएब मलिकने दुसरं लग्न करून टाकलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत त्याने आपली लग्नगाठ बांधली. शोएबने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. सानिया सारखी पत्नी असताना त्याने ज्या सना जावेद सोबत लग्न केलं ती नेमकी आहे तरी कोण?? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला. चला तर आज आपण जाणून घेऊयात कोण आहे सना जावेद….

कोण आहे सना जावेद – Sana Javed

सना ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती उर्दू टेलिव्हिजनवर यापूर्वी दिसली होती. सना जावेदने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली, त्यानंतर तिने ‘मेरा पहला प्यार’मध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केले. यानंतर ती यंदाच्या ‘शहर-ए-जात’मध्येही छोट्या भूमिकेत दिसली.

सनाने 2012 मध्ये शहर- ए- जात या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर ती अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये दिसली आहे. ‘खानी’ या रोमँटिक ड्रामामध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर सनाला खरी ओळख मिळाली.

सना जावेदने (Sana Javed) दानिश तैमूरसोबत 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘मेहरुनिसा वी लव्ह यू’ या पाकिस्तानी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती

सनाचेही आहे दुसरं लग्न –

फक्त शोएबचेच नव्हे तर सना जावेदचे (Sana Javed) सुद्धा हे दुसरं लग्न आहे. सनाने 2020 मध्ये गायक आणि गीतकार उमेर जसवाल यांच्याशी लग्न केले होते. परंतु दोघांमध्ये सार काही आलबेल नसल्याचे लगेचच उघड झालं होत. नंतर दोघांनीही सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली.

सानियाची ती पोस्ट चर्चेत –

दरम्यान, इकडे सानिया मिर्झानेही काही दिवसांपूर्वी एक सूचक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे शोएब सोबतच्या तिच्या घटस्फोटाच्या चर्चाना बळ मिळालं होते. तिने आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं होते, ‘लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. लठ्ठपणा कठीण आहे. तंदुरुस्त राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. कर्जात अडकणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. संवाद अवघड आहे. संवाद न करणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. जीवन कधीही सोपे होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल. पण आपण आपली मेहनत निवडू शकतो असं तिने म्हंटल होते.