व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा लवकरच उघड करणार; मनसे नेत्याचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शिंदे गट व भाजपकडून टार्गेट केले जात आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप, शिंदे गटाकडून ठाकरेंना चारीमुंड्या चीत करण्यासाठी प्लॅन आखले जात असताना आता मनसेकडून ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला असून नुकतेच एक ट्विट त्यांनी केले आहे. २३ जानेवारी रोजी कोरोना काळातील सर्वात मोठा घोटाळा समोर आणणार आहे, असे देशपांडे यांनी म्हण्टल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज ट्विट केल्यानंतर माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्या मनसेच्या शाखेत एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने काही कागदपत्रं आणि पेन ड्राईन शाखेत दिली. त्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाहीत. मात्र, मी तो पेन ड्राईव्ह पाहिला, कागदपत्रं पाहिली. विरप्पन गँगने कोरोना काळात मुंबईची लूट केली. या लुटीचे ढळढळीत पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी आम्ही हे सगळं माझ्यमांसमोर मांडणार आहोत. तसेच पोलिसांत तक्रारही देणार आहो.

मनसे नेत्यांकडून आता ठाकरे गटावर कोरोना काळात केलेल्या भ्रष्टाचारावरून आरोप करण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे भाजपाने देखील मुंबई पालिकेतील व्यवहारावर आक्षेप घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. आता सोमवारी मनसे नेते नेमके काय पुरावे सादर करणार? हे पाहावे लागणार आहे.