सांगली जिल्ह्याला आठ दिवसात नवीन ७ रुग्णवाहिका मिळणार ः प्राजक्ता कोरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | कोरोनाच्या लाटेमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी सात रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत. त्या आठ दिवसात दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दिली. याशिवाय जिल्हा परिषद आणखी तीस रुग्णवाहिका खरेदी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षा कोरे म्हणाल्या, राज्य शासनाच्या मदतीने मागील महिन्यात जिल्ह्यासाठी नव्या चौदा रुग्णवाहिका मिळाल्या होत्या. सध्या कोरोनाची लाट सुरु आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका नसल्याची बाब समोर आली होती. राज्य सरकारकडून जिल्हयातील आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार शासनाकडून सात रुग्णवाहिका मिळणार आहेत.

कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी, शिराळा तालुक्यातील चरण, तासगाव तालुक्यातील सावळज, वाळवा तालुक्यातील बावची, चिकुर्डे, खानापूर तालुक्यातील लेंगरे प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत. नवीन रुग्णवाहिका आठ दिवसात येतील, त्यामुळे रुग्णांची सोय करण्यातील अडचणी दूर होतील अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Leave a Comment