म्युकोरमायकोसिसचा ठाण्यात पहिला रुग्ण आढळला, महिलेचा डोळा झाला निकामी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाशी लढताना नाकीनऊ येत असताना आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस रोगाचा संसर्ग होताना आढळून येत आहे. म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे. एका महिलेला याची लक्षण आढळून आली असून या महिलेचा डोळा निकामी झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका 56 वर्षीय महिलेबाबत म्युकोरमायकोसिस ची घटना घडली आहे या महिलेला कोरोना झाला होता. मात्र याच दरम्यान त्या महिलेची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल समोर आले ज्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शुभांगी आंबेडकर यांनी या महिलेची तपासणी केली असता महिलेचे डोळे वर आलेले दिसून आले तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचा तपासणीदरम्यान लक्षात आले तसेच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्यांची कोणतीच हालचाल होत नव्हती तर महिलेच्या सिटीस्कॅन, ऑर्बिट ब्रिंग सिटीस्कॅन ची चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणं आढळून आले.

या महिलेच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज आली होती. तसेच इतरही अंतर्गत लक्षण वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आली . याआधारे म्युकोरमायकोसिस या आजाराची सांगितलेली लक्षणे या महिलेमध्ये आढळल्याने या महिलेला म्युकोरमायकोसिस असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे म्युकोरमायकोसिस ?

कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत ‘म्युकोरमायकोसिस’ हे ‘फंगल इन्फेक्शन’ आढळत आहे. ते नवीन नाही; परंतु हल्ली कोरोनामुळे प्रतिकारशक्ती तसेच उपचारादरम्यान स्टिरॉईड्सचा मारा यामुळे अनियंत्रित मधुमेहातील रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार वाढत आहे. अनियंत्रित मधुमेह रुग्णांत ‘म्युकोरमायकॉसिस’मुळे मृत्यूचे प्रमाण ४०- ८० टक्क्यांपर्यंत असून घाटीतही या आजाराचे रुग्ण तक्रारी घेऊन येत आहेत. ‘फंगल इन्फेक्शन’मुळे काही रुग्णांची दृष्टी कमकुवत झाली. काहींमध्ये नाक आणि जबड्याचे हाड काढून टाकावे लागण्याचीही भीती आहे.

श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. वेगवेगळ्या अवयवांचे ते नुकसान करतात. ‘म्युकोरमायकोसिस’ मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा नाक डोळ्याला हळू हळू सूज येताच या ‘फंगल इन्फेक्शन’चे तात्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.

Leave a Comment