सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मॉल्स, चित्रपटगृहांच्यानंतर उद्याने कुलुपबंद झाली होती. आता आज पासून महापालिकेच्या क्रीडांगणेही बंद करण्यात आली आहेत. तर गुरुवारी होणारी स्थायी समितीची सभा आयुक्त नितीन कापडणीस यांनी रद्द केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सतर्क आहे.
महापालिकेने क्वारंटाईन कक्षही सुरू केला आहे. तसेच जवळपास शंभर खाटांचे आयसोलेशन कक्षही स्थापन केला आहे. आशा वर्कर्स व आरोग्य सेविकांकडून घर टू घर सर्व्हे सुरू आहे. यात परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. मंगळवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्व उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने महापालिकेच्या उद्यानात मुले, पालकांची गर्दी होत होती. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अखेर ही उद्यानेच बंद करण्यात आली. आज क्रीडांगणांना कुलुप लावण्यात आले.
क्रीडांगणावरही सकाळी व सायंकाळी खेळाडू व नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यात शाळेला सुट्टी असल्याने क्रीडांगणावरील गर्दीत वाढ झाली होती. महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण पूर्णत: बंद केले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. सभापती संदीप आवटी यांनी अधिकाऱ्यांविना सभा घेण्याची तयारी चालविली होती. पण सायंकाळी आयुक्त कापडणीस यांनी स्थायीची सभा रद्द करण्याची सूचना सभापतींना केली.
सांगली जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –
मोठी बातमी! तब्बल ४५१ भारतीयांना झाली आहे कोरोनाची लागण, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली
करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड
कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद
दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी
राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग