हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर एकनाथ शिंदे यांना सत्तेवर आणले आहे. मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा तिथे त्यांना गुंगीचं एक इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे त्यांची गुंगी उतर नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली. त्यांच्या टीकेला शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊतांनी पिसाळलेल्या कुत्र्याचे इंजेक्शन घेतलं आहे. सरकारला नॅनो बुद्धीच सरकार म्हणणे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारणा नॅनो म्हणणं,” अशी सडकून टीका गायकवाड यांनी केली आहे.
संजय गायकवाड यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री काम करणार माणूस असून ते आपलं उत्तर त्यांच्या कामातून देतात. संजय राऊत याला वाटत कि आपल्या प्रत्येक प्रश्नच उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. ते काय एवढे रिकामे नाहीत. त्यांनी जर गुंगीचं औषध घेतलं असेल तर मला वाटत संजय राऊतांनी पिसाळलेल्या कुत्र्याचं औषध घेतलं आहे. म्हणून हा माणूस पिसाळलेल्या कुत्र्यासारखे वागतोय.
नॅनो बुद्धी हि खरं तर फडणवीसांना नाही तर संजय राऊतांची म्हणावी लागेल. कारण त्यांना हि दुर्बुद्धी सुचली कि काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याची. आम्ही जो निर्णय घेतला आहे तो बाळासाहेबांच्या विचाराचा घेतला आहे. बाळासाहेबांच्या आदर्शवर चालणारा निर्णय हा आमच्या पक्षाचा आहे, असे गायकवाड यांनी म्हंटले.