हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. यावरूनशिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झाले तरी महाविकास आघाडीचा मोर्चा हा निघणारच. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पितापुत्रांना क्लीन चिट देत दिलासा दिला असला तरी 2024 ला हे प्रकरण समोर येणार असे नाही. कोणतंही सरकार हे कायमस्वरुपी नसते. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल,” असा इशारा राऊतांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात, त्यातीलत ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले, असे सोमय्या म्हणतात आणि राजभवन म्हणते पैसे आलेच नाहीत. हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा आहे.
“आमच्या लोकांना क्लीन चिट मिळणार नाही. हा खरे तर ईडीच्या अख्त्यारितला विषय आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी झालेला हा खेळखंडोबा आहे. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?,” असा सवाल राऊतांनी केला आहे.