Tuesday, June 6, 2023

उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास काँग्रेस,आप आणि तृणमूलने त्यांना पाठिंबा द्यावा; राऊतांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर याना भाजपकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी असून ते वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवारी न देण्याचे आवाहन केलं आहे

याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत म्हंटल की, गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकर जर अपक्ष निवडणूक लढणार असती तर तर मी आम आदमी पक्ष , काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस याना आव्हान करतो कि त्यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन त्याच्या विरोधात कोणताही उमेदवार उभा करू नये. मनोहर पर्रीकर यांना हीच खरी श्रद्धांजली असेल असेही राऊत यांनी म्हंटल

मनोहर पर्रीकर हे भाजपचे मोठे नेते होते पण त्यांच्या मृत्यूनंतर भाजपने त्यांच्या कुटुंबाशी वैर घेतलं आहे. उत्पल पर्रीकर यांची लायकी आणि कर्तृत्त्व काढून त्यांचा अपमान भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे जरी भाजपने उत्पल पर्रीकर याना तिकीट दिले नाही तर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन संजय राऊत यांनी भाजपविरोधी पक्षांना दिले