हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यावरून व राज्यपालांच्या विधानावरून शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली होती. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषद घेत शिवसेनेला सुनावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी शेलारांवर निशाणा साधला. ‘‘कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.’’ असे शेलार यांनी म्हंटले. भाजपचे हे ढोंग आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असेल तर राजभवनात जाऊन चहा पिण्याऐवजी आणि बिस्कटे खाण्याऐवजी राज्यपालांना ‘कारे’ असे म्हणावे, असे राऊत यमाई म्हंटले आहे.
खा. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खुल्लेआमपणे भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करतात. काल एका नेत्याने तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असे म्हंटले. त्यांना एवढंही माहिती नाही कि त्यांचा जन्म कुठे झाला. महाराष्ट्रातील लहान मूलही सांगेल कि छत्रपतींचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्यावर झाला. भाजपला माझा सवाल आहे की, त्यांना छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रात तरी झाला का? आणि महाराजांचा जन्म तरी झाला का? हे तरी मान्य आहे का?
काल भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आमच्यात आरे ला कारे करण्याची हिंमत आहे. आम्ही कर्नाटकमध्ये जाऊन आरेला करे शकतो असे म्हंटले. त्यांनी आणि भाजपने अगोदर राजभवनात जाऊन राज्यपालांना ती भाषा वापरावी. प्रत्येकवेळी राजभवनात जाऊन त्यांची चहा बिस्कटे खाण्याचे काम भाजप नेते करत असतात. आता त्यांच्या राज्यपालांकडून छत्रपतीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली गेल्याने त्यांना जाऊन विचारावे. काहीही झाले तरी राज्यपालांवर कारवाई हि होणारच आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.