पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका

Sanjay Raut Raosaheb Danve
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच बाबरी मशिदीच्या मुद्यांवरून शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या टीकेला आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाबरीच्या मुद्यांवरून राऊतांनी दानवे व भाजपवर निशाणा साधला आहे. “दुर्बिणीने ते काय पाहतात ते पाहावे लागेल. त्यांच्याकडे दुर्बिण लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी बाबरी पाडली, असे सत्यकथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. “केंद्र सरकारने राज्याची देणी दिली पाहिजे. ते पैसे थांबवून ठेवता कामा नये, असे राऊत यांनी म्हंटले तसेच त्यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर केंद्रशासित झाला म्हणून फरक पडला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत. सामुदायिक स्थलांतर करण्याबाबत काश्मिरी पंडितांनी केंद्राला सूचना दिली आहे. केंद्रातील सरकार प्रखर हिंदुत्ववादी आहे. नोटबंदी नंतर काश्मीरमधील दहशतवाद खतम होईल, असे आश्वासन या सरकारने दिले.

या देशाची जे पोलीस सेवा करत आहेत, त्यांचे रक्षण केंद्र सरकार करू शकत नाही. सरकार पूर्णपणे फक्त निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडले आहे. राष्ट्रीय सुरक्षेकडे सरकारचे लक्ष नाही. काश्मीरमध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. पण या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही हे दुर्देव आहे, अशी टीका राऊत यांनीकेंद्र सरकारवर केली आहे.