हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यापुढं सेनेच्या वाटचालीत ‘महा’ होणार…जसं महाविकास आघाडी तसेच हेच ‘महा’ घेवून दिल्लीचे तख्त राखायला जाईल. असे उद्गार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त ते बोलत होते. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं म्हटलं होतं. पक्षप्रमुखाच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल असं म्हटलं होतं. पण पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाले याचा आनंद झाला. तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे ११ कोटी जनता मुख्यमंत्री झालीय, असंही संजय राऊत म्हणाले.
कुणी किती प्रयत्न, कारस्थानं, चिखलफेक केली तरी हे सरकार ५ वर्षे राहणार. तसंच पुढील २५ वर्षांचा करारही केलाय. तारखा कितीही द्या, पैशाचा खेळ कितीही खेळा पण या सरकारच्या पाठिशी जनता आहे, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.
हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे एक नाते आहे. वीर सावरकरांनी हिंदुत्व शिकवलं त्याच मार्गावर शिवसेना उद्धव ठाकरे पुढं नेतायत. प्रत्येक संकटाशी लढा देताना मुख्यमंत्री डगमगले नाहीत. आरोप,टीका झाली तरी राज्याचा गाडा मुख्यमंत्री पुढं नेतायत, याची नोंद इतिहासात होईल. असंही संजय राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’