हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ होती. कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, कोणीही अर्ज मागे घेतला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्हाला वाटले होते. घोडेबाजार रोखण्यासाठी मविआ च्या माध्यमातून प्रयत्न केला मात्र, भाजपने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता खरी वेळ सुरु झाली आहे, काहीही झाले तरी अपक्ष आमदार फुटू देणार नाही, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. त्यांनी घोडेबाजार रोखण्यासाठी प्रस्तावही दिला. मात्र, तो भाजपने नाकारला. आणि आता सहाव्या जागेसंबंधीतला अर्ज मागे घेतला नाही. आता सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. आता सर्वात लढत होणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या 6. जागासाठी 7 उमेदवार मैदानात असणार आहेत.
या निवडणुकीत घोडेबाजार करण्याच नक्की प्रयत्न केला जाईल. काही अपक्ष आमदारही फोडले जातील मात्र, आम्ही त्याची काळजी करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अपक्ष आमदारासोबत चांगला संवाद आहे. त्यामुळे यंदा मात्र, तसा प्रकार फोडण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. एक मात्र खरं आहार आता खरी वेळ सुरु झाली आहे. कोल्हापूरात आमचे उमेदवार संजय पवार हे लढणार आहेत.आम्हाला खात्री आहे कि आमचे चारही आमदार नक्की निवडून येतील, असा विश्वास यावेळी राऊत यांनी बोलून दाखवला.