तेरा घमेंड तो चार दिन का है पगळे, हमारी बादशाही खानदानी है; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis 01
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं नाही. राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील, फार घमंड करु नका. ‘तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी है’, बादशाहीला नख लावण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी खासदार संजय राऊत म्हणाले की, 56 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक ठिणगी टाकली. त्या ठिणगीचा आज देशभर वणवा झाला आहे. आज फादर्स डे आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप आहेत. जगात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे त्यांच्या मनातला बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत.

अंगावर आला तर शिंगावर घेणार नाही तर तुडवून लावू

यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपला थेट इशारा दिला. ते म्हणाले की, राज्याची सुत्रे ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शांत आहे. हे राज्य सर्वांना एकत्र करुन चालवावे लागेल, कपट कारस्थान करुन राजकारण होणार नाही. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले असे नाही. शिवसेनेचा बाणा हा स्वाभिमानाचा, राष्ट्रीय, मराठी, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा आहे. हा बाणा सर्वांच्या छाताडावरती उभा राहिल. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवून लावू, असा इशारा संजय राऊतांनी दिला.