हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज दादर येथील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोटही केला. “ज्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे सुरु होते, त्याच दिवशी रात्री मी अमित शाह यांना फोन केला होता. जे सुरु आहे, ते चांगलं नाही म्हटले. तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर मला टॉर्चर करा. पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना टार्गेट करत आहात. हे चुकीचं आहे, असे म्हंटले,”. असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप व त्यातील नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, माझावर अनेक घोटाळ्याचे आरोप केले गेले. माझ्या नावे असणाऱ्या अलिबाग येथील संपत्तीही चौकशी केली गेली. ज्यावेळी माझ्या घरावर ईडीने छापेमारी केली. माझ्या नारवाईकाची चौकशी केली त्या रात्री मी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. त्यांना विचारले हा प्रकार काय चालला आहे.
जी काही कारवाई करायची आहे ती माझ्यावर करावी. परंतु माझ्या मित्र, मंडळींना, नातेवाईकांना कशाला त्रास देत आहात, असे मी केंद्रीयमंत्री अमित शहा यांना विचारले. या ईडीवाल्याने लहान मुलांनाही सोडले नाही, त्यांच्याकडेही चौकशी केली असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.