हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच होते. शिवसेना ज्या बंदमध्ये सहभागी असते तो बंद लादावा लागत नाही, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.
आज महाराष्ट्र बंदला राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या बंदवरून भाजप व त्यातील नेत्यांनी अनेक आरोप केले. या आरोपांना शिवसेना खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, हा बंद आमच्या वैयक्तिक फायद्यासाठी पुकारला नव्हता. तुमच्याच भाजपशासित राज्यात शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने ठरवून चिरडलं. त्याचा निषेध म्हणून आम्ही बंद पुकारला आहे.
आजच्या महाराष्ट्र बंदवर भाजपकडून टीका केली गेली. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे कि, लखीमपूर येथील घडलेली घटना हि भाजपच्या मंत्र्यांच्या मुलामुळे घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडतयाचे कृत्य घडले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी त्याच्या निषेध म्हणून या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.