हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “बाळासाहेबांच्या स्मारकावर जाताना हातातले खंजीर अगोदर बाजूला ठेवा. मग त्याठिकाणी गेल्यावर नतमस्तक व्हा. बाळासाहेब सर्वांचे होते, ते आजही सर्व पाहत असतील हे लक्षात ठेवा, अशी टीका राऊतांनी केली आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली. एक शिंदे-फडणवीस यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले जाणार असल्याबाबत आणि दुसरी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाबाबत. यामध्ये सुरुवातीला राऊतांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले कि, बाळासाहेबांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांचे कधी भले झालेले नाही हा इतिहास आहे. सर्वजण स्मृतीस्थळावर जाऊ शकतात पण चांगल्या मानाने जा, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
यावेळी त्यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, श्रद्धा आणि तिच्यासोबत राहणार तो हे दोघे कपल नव्हते, आपल्या महाराष्ट्रातील मुलीची निर्घृण हत्या झाली आहे. ही दुर्देवी घटना आहे. अशा घटनांतून समाज कुठे चाललाय याची कल्पना येते. अशा गुन्हेगारांवर खटले न चालवता पुराव्यावरून त्यांना फासावर लटकवले पाहिजे.