आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा सन्मान करू, मात्र… ; संभाजीराजेंनंतर संजय राऊतांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आज कोल्हापुरात दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा नक्कीच सन्मान करतील अशी आशाही व्यक्त केल्यानंतर याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा जागेचा तिढा सोडवताना छत्रपती संभाजीराजेंच्या घराण्याचा आम्ही नक्कीच सन्मान करू. मात्र, शिवसेनेचे दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचेच असतील, असेही राऊत यांनी सांगितले.

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, त्यांनी ते नाकारत थेट कोल्हापूर गाठले. यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानानंतर संजय राऊतांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, आम्ही निश्चितच छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करू. पण राज्यसभेच्या जागेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असतील. याबाबत उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करतील, असे राऊत यांनी सांगितले.

संभाजीराजे काय म्हणाले?

संभाजीराजे छत्रपती यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्वाचे विधानही केले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं ते ठरलं आहे. मला खात्री आहे कि ते छत्रपती घराण्याचा नक्कीच सन्मान करतील याची मला खात्री आहे, असे महत्वाचे विधान संभाजीराजेंनी केले.

 

Leave a Comment