गोळीबार न होता आमचे २० जवान शहीद झाले? पंतप्रधान मोदींनी सत्य सांगावं – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लडाख येथे भारत चीन सीमावर्तीभागात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कोणताही गोळीबार न होता भारताचे २० जवान कसे शहीद झाले असा प्रश्न भारतीयांना पडला आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोळीबार न करता आमचे 20 सैनिक शहीद आहेत. आम्ही काय केले? असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारला आहे.

चिनी च्या भ्याड हल्ल्याला करार जवाब कधी मिळणार? गोळीबार न करता आमचे 20 सैनिक शहीद आहेत. आम्ही काय केले? किती जवान मारले गेले? चीनने आपल्या भूमीत प्रवेश केला आहे का? या संघर्षात पंतप्रधान आम्ही तुमच्या सोबत आहेत, पण सत्य काय आहे? काही तरी सांगा. देशाला सत्य जाणून घ्यायचे आहे. जय हिंद! अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान तुम्ही शूर आहेत. तसेच तुम्ही योद्धा आहेत. तुमच्या नेतृत्वात देश चीनचा बदल नक्की घेईल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सीमावर्ती भागात झालेल्या धुमश्चक्रीत जखमी असलेले आणखी ४ जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे एनआयए वृत्तसंस्थेने सांगितले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी शांत का आहेत? असे म्हणत शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे.

Leave a Comment