हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सदू आणि मधू भेटले असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटीवरून खिल्ली उडवली आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत याना एकनाथ शिंदे – राज ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारलं असता, सदु आणि मधू भेटले, बालभारतीमध्ये आम्हाला धडा होता सदु आणि मधूचा. त्यामुळे त्यांना भेटू द्या, ते जुने मित्र असतील किंवा त्यांचं प्रेम नव्याने उफाळून आलं असेल. काल मालेगावात उद्धव ठाकरे यांची विराट सभा झाली, त्यामुळे त्यांच्या भावना उंचबळून आल्या असतील. एकमेकांचे अश्रू पुसायला गेले असतील त्याला आम्ही काय करू असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी 'या' कारणामुळे राजीनामा दिला; शिंदे गटाने फोडला नवा बॉम्ब
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/MKFsCRxfRS#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 27, 2023
यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्यावरही भाष्य केलं. सावरकरांच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. राहुल गांधींसोबत माझी चर्चाही झाली आहे. सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही लहानपणापासून सावरकरांपासून प्रेरणा घेत आलो आहोत. त्यामुळे सावरकरांचा अपमान करणं किंवा त्यांना माफीवीर म्हणणे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही. आज मी दिल्लीत जाणार आहे, येत्या 2 दिवसात राहुल गांधी यांच्याशी पुन्हा या विषयावर मी चर्चा करणार आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं.