मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आज नरेंन्द्र मोदी यांच्या जीवणावरील एक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित केले. मात्र यामध्ये नरेंन्द्र मोदी यांची तुलना शिवजी महाराजांसोबत केल्याने वाद उफाळून आला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आज के शिवाजी – नरेंन्द्र मोदी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विविध स्तरांतून सदर पुस्तकाचा निषेध नोंदवला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावर प्रखर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजाचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? असं म्हणत राऊत यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला..
काहीतरी बोला..असं म्हणत राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी याविषयी आपलं मत व्यक्त करावं असं म्हटलं आहे. निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही..
एक सुर्य..एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज…छत्रपती शिवाजी महाराज…असं राऊत यांनी म्हटले आहे.