आमचं राजकारण नकलांवर नव्हे तर…; संजय राऊतांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. त्यानंतर संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचे राऊत यांनी म्हंटल.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांनी देखील बोलावं. पण आम्हांला ईडी ची नोटीस आली म्हणून आम्ही गप्प नाही बसलो अस म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे. आम्ही कोणाचे मींदे नाहीत, त्यामुळे आम्ही बोलत राहू. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले-

मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. ‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा सवाल करत राज यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

Leave a Comment