हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरामधील अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तर अमरावतील भाजपने बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागले. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. काश्मीर पंडितांच्या हत्येविरोधात मोहन भागवतांनी मोर्चा काढत मोदींना जाब विचारावा असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
काश्मीरमधील पंडितांच्या हत्या होत आहेत. जवानांच्या हत्या सुरू आहेत. त्या बांगालदेशातील घटनांपेक्षा भयंकर आहेत. त्यासाठी समस्त राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं आणि दिल्लीत मोठा मोर्चा काढावा. हिंदू खरोखरच खतरे में है असं वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवतांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं, ते करणार आहात का नेतृत्व? हिंदूंबाबत आपल्या देशात काय चाललं आहे याचा जाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारावा, असं राऊत म्हणाले.
खरं म्हणजे त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद का उमटावे? त्रिपुरामध्ये असं काय घडले आहे ज्यामुळे महाराष्ट्रात लोकांनी हिंसा करावी? बांग्लादेशमध्ये मंदिरांवर हल्ले झाले म्हणून त्रिपूरामध्ये मोर्चे निघाले. त्यामोर्चातून असे म्हणतात की, मस्जिदींवर दगडफेक झाली. याचे पडसाद महाराष्ट्र उमटले. मग महाराष्ट्रातचं का? उत्तरप्रदेशमध्ये का नाही? दिल्लीमध्य़े का नाही? बिहारमध्ये का नाही? कर्नाटकात नाही? फक्त महाराष्ट्रात का असा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे या घटनेमागे मोठं कारस्थान आहे असंही संजय राऊत म्हणाले.