राणेंना तर तेव्हा बाईने पाडलं; अजितदादांचा व्हिडिओ राऊतांकडून Tweet

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार संजय राऊत आणि केंद्रीय नेते नारायण राणे यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केल्याचे सुद्धा आपण पाहिले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका भाषणातील व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार त्या व्हिडिओत नेमकं काय म्हणतात-

सध्याच्या शिवसेना फुटीबीबाबत भाष्य करताना अजित पवार म्हणतात कि, ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली ते सर्व निवडणुकीत पडले. अगदी छगन भुजबळ यांच्यापासून ते नारायण राणे यांच्यापर्यंत सर्व नेते निवडणुकीत पडले. नारायण राणे तर २ वेळा पडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईतील विधानसदभ निवडणुकीत पडले. त्यावेळी तर एका महिलेने त्यांना पाडलं. बाईनं पाडलं बाईनं असं आपल्या खास रांगड्या शब्दात अजित पवारांनी राणेंचा समाचार घेतला. संजय राऊतांनी नेमका तेवढाच व्हिडिओ ट्विटर वर शेअर करत राणेंवर निशाणा साधला आहे. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र! असे कॅप्शन सुद्धा त्यांनी वापरलं.

संजय राऊत यांनी अजित पवारांचा व्हिडिओ शेअर केल्यांनतर नारायण राणे याचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी अजितदादांवर टीका केली आहे. अजित दादा मोठे नेते.. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा.. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे.. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले.. शाम सावंत सोडून.. माहिती असुदे दादा.. बस या वेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा.. असं प्रत्युत्तर त्यांनी दिले. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले.. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्री च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात.. असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.